अहमदनगरउत्तर महाराष्ट्रप्रशासनयुथ कट्टारणधुमाळीराज्य

वंचितांना त्यांचे न्यायहक्क मिळवून देणार – सुजात आंबेडकर

Spread the love

अहमदनगर (प्रतिनिधी) –  वंचितांना त्यांचे न्यायहक्क मिळवून द्यायचे आहेत आजपर्यंत सत्तेच्या बाहेर असणारा समाजातील वंचित असणा-या घटकांना सत्तेत सहभाग करून त्यांना त्यांचा न्यायहक्क मिळवून देणार असे सुजात आंबेडकर म्हणाले.

काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा आमचा उद्देश आहे. आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणायचे आहे असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राहाता येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या युवा परिषदेत बोलताना ते म्हणाले, मी वंचित बहुजन आघाडीचा केवळ कार्यकर्ता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा समजावून घेणे, युवकांचे संघटन बांधण्याचे काम करीत आहे. काँग्रेसशी युती होईल की नाही हे सांगणे आता कठीण आहे. लोकसभेच्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची ‘बी’ टीम आहे, असा प्रचार केला होता. आता काँग्रेसने पहिले हे सिद्ध करावे की वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम आहे किंवा नाही. त्यांनी राजकीय हतलबतेने आरोप केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: