कोल्हापूरगरजवंतदातापश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनमदतीचा हातयोजनारणधुमाळीराज्यसांगलीसातारासामाजिकसामाजिक संस्था

प्रकाश आंबेडकरांचे पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

Spread the love

सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील काही भागात पूरजन्य परिस्थिती पाहता तेथील पुरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत आहे. सध्या कोल्हापुरसह अनेक ठिकाणी पाणी ओसरतय. पुढील तीन दिवस तरी पाणी पूर्णपणे ओसरणार नाही. पुढील तीन दिवसांत येथील नागरिकांना संसार उपयोगी वस्तू भांडी, शालेय साहित्य, तांदूळ, डाळी, मसाला, तेल, बिस्कीट, ब्लँकेट, लेडीज कपडे, लहान मुलांचे कपडे, सँनिटरी नँपकिन, ग्लोज, एनर्जी ड्रिंक आदी गोष्टींची गरज लागणार आहे.


माझे सर्व सामाजिक संस्था, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, सर्वांनी आपल्या परीने शक्य तेवढी मदत करून पूरग्रस्तांना या संकटातून सावरण्यासाठी हिम्मत द्यावी.

संसार उपयोगी वस्तूंची निकड भासत असल्याने ती पुरविणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपल्या वापरातील इत्यादी वस्तूंची वाटप करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार्य करायचे आहे. या सर्व वस्तूंची गरज तेथे मोठ्या प्रमाणात भासणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: