उस्मानाबादऔरंगाबादकोल्हापूरजालनानांदेडपश्चिम महाराष्ट्रप्रशासनमराठवाडारणधुमाळीराज्यसांगली

सरकारकडे निवडणूक प्रचाराच्या कामासाठी पैसे मात्र , पुरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागाला मदतीसाठी निधी का नाही? – प्रकाश आंबेडकर

Spread the love

नागपूर – शासनाने पूरग्रस्त लोकांना कुठलीही मदत दिली नाही, एकीकडे पूर परिस्थिती निर्माण होत असताना भाजप आणि मुख्यमंत्री निवडणूक प्रचारासाठी यात्रेत सहभागी होते, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पूरग्रस्तांना ताबडतोब मदत निधी म्हणून खावटी देण्यात येते ती अजूनही लोकांना देण्यात आली नाही. आमदार, मंत्री पूरग्रस्त भागात भेटी देत असल्याने प्रशासन त्यांच्यामागे फिरत आहे. परंतु पूरग्रस्तांना मदत मिळत नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री पर्यटन करायला जातात. ते पूर परिस्थिती बद्दल गंभीर नाहीत असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरात अडकले असताना सरकारकडे निवडणूक प्रचाराच्या कामासाठी पैसे आहेत मात्र दुष्काळग्रस्त भागाला मदतीसाठी निधी का नाही? असा सवालही त्यांनी विचारला.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: