उत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रप्रशासनमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भ

वंचित बहुजन आघाडी भटक्या विमुक्तांना सत्तेत बसवणार – डाॅ.अरूण जाधव

Spread the love

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हजारो कोस सत्तेपासून दूर असणा-या भटक्या विमुक्त समाजला प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व “वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामातून सत्तेत बसवणार व वंचित घटकाला न्याय मिळवून देणार असे भटक्या विमुक्तांचे नेते अरूण जाधव यांनी कर्जत जामखेड येथे बोलताना सांगितले. पशू पक्षी जनावरे यांच्या साठी शासन बजेट करते मात्र  समाजातील वंचित घटक असलेल्या भटक्या विमुक्तांना शासनाने कोणतेहे स्वतंत्र बजेट नाही अशी टीका केली.

भटक्या विमुक्त समाजाची भाजप व काँग्रेस सरकारे कायमच अवहेलना करत आलेली आहे. मागील ७० वर्षांपासून  ब्रिटिशकालीन कायद्याचा वापर करत भटक्या  विमुक्तांना गुन्हेगार समजत आहे कायमच अन्याय करत आलेलेली आहेत.

वंचित बहुजन आघाडी  महाराष्ट्रात सत्तेत आल्यास ओबीसीच्या सोबतच भटक्या विमुक्तांची सुध्दा जनगणना करेल व काँग्रेस व भाजपने  भटक्या विमुक्तांवर केलेला अन्याय वंचित बहुजन आघाडी दूर करेल असे डाॅ. अरूण जाधव यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: