आरोग्यइतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसामाजिक

श्री इंटरप्रायजेसच्या वतीने येवलेवाडी येथे रुग्णांना मदत

Spread the love

चंद्रकांत चौंडकर, (पुणे) – पैसा इकडे तिकडे खर्च करण्या पेक्षा आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत हवेली तालुक्यातील येवलेवाडी अंतुलेनगर येथील शासकीय बंदोरवाला कुष्ठरोग रुग्णालयात महिला व रुग्णांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिला रूग्ण व इतर रुग्णांना नागपंचमी व राखी पौर्णिमा निमित्त साडी,बांगड्या,मिठाई,सौंदर्य प्रसादने आदींचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन श्री इंटरप्रायजेस वतीने किशोर गिरमे,गणेश सोनवणे,विजय कांबळे यांच्यातर्फे करण्यात आले.श्री इंटरप्रायजेसच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.त्यांच्या उपक्रमामुळे अनेक गरिबांना त्याचा लाभ झाला आहे.

यापुढे ही चांगले उपक्रम राबवून समाज्याची सेवा करणार असल्याचे किशोर गिरमे यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विष्णु वाडकर ,रुग्णालयाच्या प्रशासक डॉ मीरा भोई,डॉ नितीन शहा,डॉ किरण शहा ,डॉ विष्णु खरात,भानुदास टिळेकर,पंकज टिळेकर तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी,आदी उपस्थित होते. फोटो ओळ : येवलेवाडी (ता.हवेली) येथे महिलांना साडी वाटप करताना मान्यवर व इतर

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: