राज्यविदर्भ

दोन महिन्यात रस्ता गेला वाहून; जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाईची मागणी

Spread the love

निखिल खानोरकर, (वणी) – शहरातील दीपक चौपाटी ते जँगली पिर बाबा दर्गा पर्यंत चा रस्ता नुकताच 2019 च्या मे महिन्यात बांधण्यात आला होता मात्र जुलै महिन्यात पडलेल्या 5 दिवसाच्या पावसात रस्ता पूर्ण उखडला आहे. संपूर्ण रस्त्याला खड्डे पडले असून सर्व बारीक गिट्टी निघाली आहे. या निकृष्ट कामाची तक्रार रविंद्र कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे करून सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वणी शहरातील रस्ते म्हणजे खूपच डोकेदुखी आहे. कारण सर्वत्र विकास काम सुरू आहे पण दर्जा मात्र कुठेच दिसत नाही. दीपक चौपाटी ते जंगली पिर बाबा दर्गा पर्यंत बरेच वरश्यापासून रस्ता खराब होता. नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली. शेवटी निवडणूकीच्या तोंडावर रस्ता सुंदर गुळगुळीत तयार करण्यात आला आणि विकास केला म्हणून दाखवण्यात आला.

विकास चा जन्म झाला व जनतेला वाटले हा विकास खूप उत्तम झाला मात्र जुलै महिन्याच्या झालेल्या संथ पावसाने विकास चा असा भयानक मृत्यू होईल अस जनतेला वाटलं नाही. अवघ्या दोन महिन्यात बांधण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पुन्हा खड्डे पडले असून रस्त्यावर ची गिट्टी निघाली आहे.

विकास कामे करत आहे पण दर्जा मात्र कुठेही दिसत नाही. जिल्हाधिकारी प्रकरणात लक्ष घालून झालेला भ्रष्टाचार व दोषींवर कोणती कारवाई करतात यावर जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: