अहमदनगरउत्तर महाराष्ट्ररणधुमाळीराज्य

पंढरपूर येथील धनगर समाज आरक्षण उपोषणाला अहमदनगरमधून २५ हजार कार्यकर्ते जाणार

Spread the love

सुनिल नजन, (अहमदनगर) – धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नऊ आँगष्ट ला क्रांती दिनाच्या मुहूर्तावर पंढरपूर येथे पाच लाख धनगरांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या ऊपोशनास पाठिंबा देऊन सहभागी होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पंचविस हजार कार्यकर्ते जाणार असून ऊपोशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती अहमदनगर येथील विश्राम ग्रुहावर झालेल्या धनगर समाजाच्या जिल्हा बैठकीत देण्यात आली.

जेष्ठ नेते भाऊसाहेब राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.या बैठकीस भगवानराव जर्हाड, विजय तमनर, अशोक कोळेकर,पांडुरंग दातिर, राजू तागड, अशोक वीरकर बाबासाहेब तागड हे प्रमुख वक्ते हजर होते.

अनेक मांन्यवरांनी धनगर समाजाला आरक्षणासाठी सरकारने झुलवत ठेवल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून आदिवासीच्या सवलतीचे गाजर दाखवून समाजाची फसवणूक केली जात आहे हे समाज्याच्या लक्षात आले आहे.जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही असे सांगण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावातुन मोर्चे,घंटानाद, प्रभातफेरी, घोषणा बाजी या पद्धतीने गावपातळीपासून हा धनगर समाज आरक्षणाचा एल्गार पुकारून सरकारला सत्तेवरून खाली खेचन्यासाठी सत्ताछोडो आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.अशी या आंदोलनाची व्युहरचना करण्यात आली आहे. यावेळी निशांत दातिर, भाऊसाहेब नजन,गणेश शिंदे, चंद्रभान वीरकर, रामदास नजन,अशोक पंडित, अरूण डोंगरे ई.मांन्यवर ऊपस्थीत होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: