नवी मुंबईमुंबईराज्य

जुईनगर येथील चिंचोली तलावाची तटबंदी धोकादायक; मनसे करणार पाठपुरावा

Spread the love

संदीप निकाळजे, (नवी मुंबई) – २१व्या शतकातील विकसित आणी तलावांचे शहर म्हणुन नवी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने शहरातील सर्व तलावांचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच तलावातील पाणी स्वच्छ राहण्यासाठी तलाव व्हिजन हा उपक्रम राबवुन करोडो रूपये ख़र्च केलेले आहेत.

यात तलावातील गाळ उपसणे, तलावाच्या तटबंदी दगडी बांधकाम करून मजबुत करणे, त्यावर लोंखडी जाळ्या बसवणे आणी विसर्जनामुळे तलावातील सर्वच पाणी दुषित होऊ नये म्हणुन तलावाच्या मधोमध ग्याब्रिअल पद्धतीची भिंत बांधली आहे. तसेच तलावांवर २४ तास सुरक्षारक्षक तैनात ठेवणे हे देखिल नियोजित होते.

चिंचोली तलावा फ़्लोरिंग साठी जे चौकणी दगड वापरण्यात आले आहेत ते तलावाच्या काही ठिकाणी उखडुन पडलेले दिसत आहेत. त्यामुळे तेथे फिरण्यासाठी व चालण्यासाठी येणारे नागरीक, वृद्ध, महिला, मुले ठेच लागुन पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

अशातच तलावाच्या मागील बाजुस असणारी तटबंदी कमकुवत झाली असल्याने ती कधी ही खचु शकते यावर कोणाचे हि लक्ष नाही हि बाब विशेष आहे , अशी माहिती नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: