इतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईयुथ कट्टाराज्यविदर्भ

‘फ्रेंडशिप डे’ का साजरा केला जातो ? घ्या जाणून…

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (ब्युरो रिपोर्ट) – दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. त्याचप्रमाणे भारतातही आज 4 ऑगस्ट रोजी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जाणार आहे. यादिवशी मित्र-मैत्रिणी आपल्या खास मित्र परिवाराला भेटवस्तू देतात, संदेश पाठवतात आणि पार्टी देखील करतात. प्रत्येकाची फ्रेंडशिप डे साजरा करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे.

का साजरा केला जोतो ‘फ्रेंडशिप डे’
भारतात फ्रेंडशिप डेला सुरुवात होण्याआधी हा खास दिवस दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये खूप वर्षांपासून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. 1958 साली पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यास सुरुवात केली. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाणारा फ्रेंडशिप डे भारततही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे या दिवसाच महत्व जास्तच वाढल आहे.

आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’
संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: