इतरकोकणपश्चिम महाराष्ट्रप्रशासनमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

शरद पवार यांनी खेळली जातीयवादी खेळी ? मातंग समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न

Spread the love
महाराष्ट्र विश्व न्यूज, (सांगली) – वंचित बहुजन आघाडीची धास्ती घेऊन  शरद पवार यांनी एक नवीन जातीयवादी खेळी करत मातंग समाजाला चुचकारण्याची राजकीय खेळी करत जातीय समीकरणे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
याचाच भाग म्हणून मातंग समाजाने आपले प्रश्न घेऊन आमच्याकडे यावे असे वक्तव्य केले. वंचित बहुजन आघाडी ही येणा-या विधानसभेला सगळ्या जागा लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी शक्य नाही असे सांगितले असल्यामुळे  विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस समोर अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभेला दलित मुस्लिम समाजाची मते वंचित बहुजन आघाडी कडे वळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोरील अडचणीत वाढ झालेली आहे .
या सर्व गोष्टी मुळेच पवारांनी राजकीय दृष्ट्या जातीयवादी खेळी करत मांतगसमाजाला चुचकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: