इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमनोरंजनराज्य

परिणीती चोपडा व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या चित्रपटाचे डॉ .डी. वाय पाटील विद्यापीठात प्रमोशन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पिंपरी) – अभिनेत्री परिणीती चोपडा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने डॉ .डी. वाय पाटील विद्यापीठात हे दोघेही आले होते.

यावेळी जबरिया जोडी अर्थात परिणीती व सिद्धार्थ डॉ .डी. वाय पाटील दंत महाविद्यालयात येताच सर्वानी एकच जल्लोष केला. टाळया, शिट्ट्या च्या मोठ्या आवाजात त्यांचे तरुणाईने स्वागत केले. सिद्धार्थ यांनी या चित्रपटाविषयी थोडक्यात सांगितले जे बिहारमध्ये प्रचलित वरांचे (पाकडवा विवाह) अपहरण करण्याच्या प्रथेवर आधारित आहे. ‘जबरिया जोडी’ च्या गाण्यावर दोघांनी नृत्य केले.

यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थिती होती. या चित्रपटाच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सुद्धा नृत्य सादर केले. सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. येत्या ९ ऑगस्ट रोजी ‘जबरिया जोडी’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सर्वानी पाहावा यासाठी अभिनेत्री परिणीती चोपडा यांनी सर्वाना आवाहन केले.

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कोषाध्यक्ष व ट्रस्टी डॉ यशराज पाटील व पत्नी यशश्री पाटील यांनी अभिनेत्री परिणीती चोपडा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचे स्वागत केले व त्यांच्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: