राज्यवर्धाविदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे तळेगाव नगरीत स्वागत

वर्धा जिल्हातुन प्रथमच महाजनादेश यात्रेची तळेगावातुन सुरुवात

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (वर्धा) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाच वर्षे पूर्ण होत असल्याने आज पासुन राष्ट्रसंत तुकोजी महाराज मोझरी येथुन त्यांनी महा जनादेश यात्रेला सुरुवात केली.

त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पहिला टप्पा म्हणजे तळेगाव शामजि पंत येथे पाच वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता होले, माजी आमदार दादाराव केचे व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर दिवे, राहुल ठाकरे, धनश्री दिवे, विशाल गाडगे व आजी माजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तळेगावातील नागरीकांनो पुढील 5 वर्षामध्ये जनतेची एकही समस्या ठेवणार नाही असे मी तळेगाव वासियांना वचन देतो. एक एक पैसा गोळा करून जनतेचा पैसा जनतेच्या कामी लावला. तरी हिशोब तुम्हाला दिला पाहिजे असे ते आपल्या भाषणामध्ये बोलताना म्हणाले. ज्या मतदार राजाने निवडून दिले त्यांच्यासाठी म्हणून आपण ही महाजनादेश यात्रा सुरु केलेली आहे. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचल्या का तसेच विकासाच्या कामाचि पोचपावती देण्यासाठी महाजनादेश यात्रा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: