अहमदनगरउत्तर महाराष्ट्ररणधुमाळीराज्य

धनगर आरक्षण, संरक्षण, सत्ता संपादन अभियानांतर्गत नेवासा फाटा येथे बैठक संपन्न

Spread the love

सुनिल नजन, (अहमदनगर) – जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धनगर समाज सत्ता संपादन महाअभियाना अंतर्गत यश सांस्कृतिक भवनात बैठक संपन्न झाली. या बैठकिच्या अध्यक्ष स्थानी हंसराज मंडलिक तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, भगवान जर्हाड, अशोक व्हनमाने, नामदेव खंडागळे, राजेंद्र तागड, अशोक कोळेकर हे होते.

प्रारंभी बाळासाहेब भागवत यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांनी आपलें विचार व्यक्त केले व धनगर समाजाच्या आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी वंचित आघाडी धनगर समाजाला विधानसभेची उमेदवारी देऊन धनगर आमदार करणार आहे त्यासाठी धनगर समाजाच्या सर्व नेत्यांनी आपल्या राजकीय झुली झूगारून देऊन धनगर समाजाचाच आमदार झाला पाहिजे ही खूनगाठ मनाशी बांधून नेमकं कोणाला आमदार करायचे हे धनगर समाजाने ठरवून एका नावावर एकमत करून प्रदेश कमिटीला कळवावे असे प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर यांनी सांगितले.

यासाठी सर्व नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. प्रस्थापितांना जोरदार शह देण्यासाठी नेवासा तालुक्यातील पंचेचाळीस हजार धनगर समाजाची मत वंचितच्या पारड्यात टाकून धनगर समाजाचा आमदार झालाच पाहिजे असे पडळकर यांनी सांगताच उपस्थितांनी यळकोट यळकोट च्या घोषणा देत सहमती दर्शवली.

या बैठकीत अनेक गोपनीय निर्णय घेण्यात आले. यावेळी शशिकांत मतकर, राजेंद्र झाडे, अनिल महांकाळे, संभाजी कराडे, नामदेव कराडे, कानिफ कराडे, माऊली देवकाते, साहेबराव देवकाते, नंदू महानोर, देवदान साळवे, लक्ष्मण दाणे यांच्या सह तालुक्यातील अनेक मातब्बर नेते उपस्थित होते. धनगर समाजाचा उमेदवार उभा राहनार असल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांची राजकीय समिकरणे मोडीत निघाल्यामुळे प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: