पश्चिम महाराष्ट्ररणधुमाळीराज्यसाताराUncategorized

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर?

Spread the love
सातारा –  माण-खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांची झरे येथील त्यांच्या गेस्ट हाऊस येथे भेट घेतली असल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्या निमित्ताने मोठ्या  राजकीय घडामोडी घडून काँग्रेसला भगदाड पडण्याची शक्यता आहे अशी विश्वसनीय माहीती मिळाली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक व काँग्रेसचे आमदार असलेले  जयकुमार गोरे यांनी लोकसभेला भाजपचे  फलटणचे  रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचाराची माण खटाव मध्ये यशस्वी  धुरा संभाळली होती. आमदार गोरे यांनी आघाडी धर्म न पाळता भाजपला मदत केली होती व लोकसभेच्या निमित्ताने गोरे हे काँग्रेस पासून दूर गेलेले आहेत, तर माण खटावचे स्थानिक भाजपचे पदाधिकारी व माजी आमदार दिलीप येळगावकर यांचा जयकुमार गोरे यांना विरोध आहे. या सगळ्या घडामोडीत विधानसभेच्या निमित्ताने  आमदार जयकुमार गोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांची भेट घेतल्याने  आमदार जयकुमार गोरे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशात भाजपची सत्ता आली. परंतु राज्यात मात्र प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीने मात्र राज्यात खळबळजनक कमगिरी करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचा सुफडा-साफ केला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतदानामुळे बऱ्याच ठिकाणी आघाडीचे मातब्बर उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, यांना पराभवांचा सामना करावा लागला होता. तसेच वंचित आघाडीने संपूर्ण  राज्यात एकूण घेतलेल्या मतदानामुळे तसेच भविष्यात दोन नंबर फळीतील कार्यकर्त्याकडून आपला पराभव होवू नये म्हणून बरेच आजी-माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: