इतरपर्यावरणयवतमाळयुथ कट्टाराज्यविदर्भशिक्षण

कुलगुरू डॉ. नामदेवराव कल्याणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (राजुरा-चंद्रपुर) – श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने ३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत महाविद्यालयीन परिसरात गोंडवाना विद्यापीठाचे सन्मानानिय कुलगुरू डॉ. नामदेवराव कल्याणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज लक्षात घेऊन पृथ्वीचे वाढते तापमान, निसर्गात वृक्षतोडीमुळे झालेले बदल, पृथ्वीवरील जंगलाचे कमी होत चाललेले प्रमाण, त्यामुळे वन्यप्राण्यांचा मानववस्तीमध्ये वाढलेला संचार आणि त्यातून अनेक निरपराध नागरिकांचा जात असलेला नाहक बळी या सर्व बाबीचा मानवाच्या जीवनप्रणालीवर पडणारा प्रभाव लक्षात घेऊन महाविद्यालयातील रासेयो पथक दरवर्षी महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण करत असतांनाच वृक्षारोपणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे महत्वाचे आहे म्हणून महाविद्यालयात दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन परिसरात आजतागायत अनेक वृक्षांची लागवड राष्ट्रीय सेवा योजना पथकाने केलेली आहे. संपूर्ण महाविद्यालयीन परिसर वृक्षानी हिरवागार करण्याची किमया रासेयो पथकांनी साध्य केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चालू शैक्षणिक सत्रात वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ मा. कुलगुरू डॉ. कल्याणकर सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

सदर कार्यक्रमास मानव्यविद्या विद्याशाखा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे अधिष्ठाता डॉ. श्रीराम कावळे, डॉ. संजय गोरे सदस्य विद्वत सभा, संस्थेचे सचिव श्री अविनाश जाधव, जि. प. सदस्य श्रीमती मेघाताई नलगे, प्रा. मल्लेश रेड्डी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की इतर प्राध्यापक वृंद, महाविद्यालयातील रासेयो चे स्वयंसेवक/स्वयंसेविका उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: