उत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईयुथ कट्टारणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

राष्ट्रवादी – काँग्रेसचे आजी-माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात !

Spread the love

महाराष्ट्र  विश्व न्यूज, (मुंबई ) – लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने निर्णायक मते घेत राष्ट्रवादी व काॅग्रेसला हादरा देत महाराष्ट्राच्या राजकारणात बरोबरीचे स्थान निर्माण केलंय.

लोकसभा निवडणुकीत झालेली हद्दपार सदृश्य दयनीय अवस्था विधानसभेला होऊ नये म्हणून काँग्रेस – राष्ट्रवादीने वंचित आघाडीला आपल्या सोबत घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा करून आपल्या सोबत घेऊ असे सांगितले असले, तरी वंचित आघाडीने कॉंग्रेस सोबत बोलणीची तयारी दर्शवली आहे.  10 ऑगस्टपर्यंत आघाडी संदर्भात बोलणी न झाल्यास 15 ऑगस्टनंतर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार जाहिर करेल अशी घोषणा अॅड.  प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  वंचित आघाडी २८८ जागा लढवण्याच्या मनस्थिती असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे अवसान गळून पडलेले आहे.

राष्ट्रवादी व काॅग्रेसचे अनेक नेते भाजप व शिवसेनेत जात असतांना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील आजी माजी आमदार नेते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत.  लोकसभेला काही ठिकाणी वंचितचे उमेदवार दोन नंबरला, तर काही ठिकाणी तीन नंबरला होते, तर काहींना  लाखाच्यावर मतदान उमेदवाराना झाले होते.

नुकतेच लातुर शहरातील राष्ट्रवादी कॉंगेसच्या एकमेव नगरसेवकाने वंचित आघाडीत प्रवेश घेतल्याने अनेकजण त्या मार्गावर आहेत. आगामी काळात या सर्व गोष्टींचा विचार करून काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विधानसभा लढवण्यासाठी ईच्छूक असणा-या आजी माजी आमदार व पदाधिकारी नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचा रस्ता धरला असल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांनी  दिली आहे. आगामी काळात हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: