अहमदनगरइतरउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रपुणेबीडमराठवाडारणधुमाळीराज्यसातारासामाजिक

रोहितदादा पवार दुष्काळग्रस्तांसाठी ‘जलदूत’ ; राज्यात १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

कर्जत-जामखेड येथे ८०, माण-खटाव येथे ३०, आता बीड येथे २१ टॅंकर होणार सुरू

Spread the love

विशाल मुंदडा, (ब्युरो रिपाेर्ट) – महाराष्ट्रात भयाण दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करणारे रोहितदादा पवार हे त्याच्यासाठी ‘जलदूत’ असल्याच्या भावना दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या.

महिनाभरापूर्वी रोहितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी कर्जत-जामखेड येथे ८० पाण्याचे टँकर सुरु केले. त्यापाठोपाठ माण-खटाव येथे ३० टँकर सुरू करण्यात आले. मराठवाड्यातला भयाण दुष्काळ पाहता त्यांनी बीड जिल्ह्यात २१ टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्हा मागील ४ वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. याठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र मायबाप असलेल्या सरकारला नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसत आहे.

याचा शुभारंभ (दि. 30) रोजी सकाळी 10.00 वाजता राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष रोहितदादा पवार हे करणार आहेत.

शरद पवार यांच्याबरोबर दुष्काळी दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा रोहितदादांनी जाणून घेतल्या होत्या. छावणी चालकांचे प्रश्न समजून घेतले. शासनाकडून लोकसंख्येनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याने पाण्यासाठी प्रचंड ओरड होत असल्याचे चित्र समोर आले. शासकीय आकडेवारीनुसार सध्या बीड जिल्ह्यात केवळ १४ टँकर सुरू आहेत. या पाण्याच्या टँकरमुळे नक्कीच जिल्हावासियांची तहान भागणार असून लवकरच आणखी काही टँकर जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे रोहितदादा पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

निस्वार्थ मनाने शेतकर्‍यांच्या मदतीला धावणारा नेता

मागील काही दिवसात दुष्काळी भागातील पुण्यात शिकणाऱ्या ५०० हून अधिक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत मेसची व्यवस्था त्यांनी केली. त्यानंतर आता राज्यभरात दुष्काळी भागात लोकांची तहान बागवण्यासाठी टँकर सुरू करुन पाणी पुरवठा करण्याचे काम रोहितदादा करत आहेत. त्यामुळे रोहितदादा ‘जलदूत’ असल्याची भावना याठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: