इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनयुथ कट्टाराज्यशिक्षण

सदाशिव पेठेत “मी अधिकारी” नावाच्या पोस्टरने खळबळ?

Spread the love

अमोल साळवे, (पुणे) – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रमुख केंद्र असलेल्या सदाशिव पेठेत “मी अधिकारी” नावाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मी अधिकारी हा नक्की काय प्रकार आहे हे सकाळपासून विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला असून “मी अधिकारी”  या पोस्टरमुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सध्या सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या ये लाव रे तो व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत असताना मी” अधिकारी” नावाचे पोस्टर सदाशिव पेठेसह, नवी पेठ, गाजवे चौक, अलका चौक ,डेक्कन, नारायण पेठ, शनिवार पेठ आणि शिवाजीनगर या भागात लावण्यात आली आहेत.

या पोस्टरच्या मागे कोणी आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असले तरी “मी अधिकारी” बाबत काही बड्या खाजगी स्पर्धा परीक्षा कोचिंग करणाऱ्या संस्थांमार्फत अधिकाऱ्यांना बोलावून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन तर केले जाणार नाही ना? याबाबत विद्यार्थांमध्ये चर्चा सुरू आहे.

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: