पश्चिम महाराष्ट्रपुणेरणधुमाळीराज्य

राष्ट्रवादीला मतदान करा, अन्यथा ऊस नेणार नाही ?

दौंडचे माजी आमदार व जिल्हा परिषद सदस्य यांचा प्रताप

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (दौंड-पुणे) –  बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनाच मतदान करा अन्यथा तुमची गाठ माझ्याशी आहे, याद राखा, तुमचा ऊस नेणार नाही असा सज्जड दम दौंडच्या माजी आमदाराने शेतकऱ्यांना दिलाय. दौंडच्या पूर्व भागात प्रचारादरम्यान माजी आमदार व एका जिल्हा परिषद सदस्याने हा प्रताप केल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे दौंड तालुक्याचे विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते. नाराज शेतकऱ्यांनी मात्र काहीच न बोलता गुपचूप ऐकून घेतले त्यामुळे या घटनेमुळे शेतकरी व इतर काय भूमिका घेतो हे 23 तारखेलाच कळेल. भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांचा वाढता प्रतिसाद तसेच भाजपने बारामतीसाठी लावलेली ताकद यामुळे सुप्रिया सुळे यांचा पराजय निश्चित मानला जात आहे असे काहीसे चित्र बारामती लोकसभेच्या रिंगणात पाहायला मिळत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: