पश्चिम महाराष्ट्रराज्यसोलापूर

माढा तालुका भा.ज.पच्या तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांच्या गावातच भा.ज.पला सुरूंग

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (माढा-सोलापूर) – राष्ट्रवादी काॅग्रेस चे उमेदवार संजय शिंदे चा वारू रोखण्यासाठी भा.ज.प चे संजय कोकाटे जिवाच रान करत आसताना त्यांना स्वताचाच बुरूज कधी ढासळला याचा पत्ताच लागला नाही. यामुळे संजय कोकाटे यांना भा.ज.प मधे आता तोंड लपवण्याची पाळी आली आहे.

त्यांच्या माळेगाव मधील त्यांचेच भा.ज.प पार्टीचे माळेगाव मधील किंग मेकर ची भुमीका साकारणारे भगवान नारायण गायकवाड पाटील व माळेगाव ग्रामपंचायतीचे संजय कोकाटे गटाचे भाजप चे अभिजीत लोंढे, धनाजी लोंढे, संजय दळवी या 3 ग्रामपंचायत सदस्यांसह माळेगावच्या राजकारणात ज्यांच्या आधारावर माळेगावच राजकारण संजय कोकाटे करतात असे रामचंद्र गायकवाड, सुर्यकांत लोंढे, तानाजी किर्ते, तानाजी नरसाळे, भारत गायकवाड या अशा मान्यवरांनी व त्यांच्या सहकारी मिञांनी माढा तालुक्याचे बबन शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत संजय शिंदे याच्या प्रचारात भाग घेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

आपण संजय कोकाटे यांच्या मनमानी व हूकुमशाही कारभाराला कंटाळुन सामान्य जनतेचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीमधे प्रवेश करून माळेगावमधुन कोणाची कीती ताकद आहे हे महाराष्ट्राला दाखवुन देऊ आसे सर्वच मान्यवरांनी सांगीतल.

भा.ज.प च्या तालुका अध्यक्षाच्याच गावात राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना मताधिक्य दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आसा निर्धार सर्वच कार्यकर्ते व जनतेने केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: