इतररणधुमाळीराज्यसोलापूर

सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज?

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, ( सांगोला ) – तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी संजय शिंदे यांच्या वर नाराज असून आम्ही शिंदे यांचे काम करणार नाही असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाव न छापण्याच्या अटीवर खाजगीत सांगत होते.

मागील विधानपरिषदेच्या निवडणूकी दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवाराच्यां पराभावास कारणीभूत असणा-यांचा आम्ही प्रचार कसा करू असा सवाल उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे सांगोला तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो त्यास कृष्णा भिमा स्थिरीकरण या योजनेमुळे या भागात पाणी येईल असे वाटत असताना शिंदे यांनी या योजनेला केलेला विरोध हा प्रामुख्याने नाराजीचे कारण आहे.

शिंदे यांच्या पाण्याच्या विरोधाच्या राजकारणामुळे स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नारज आहेत. सांगोला तालुक्यात मोहिते पाटील व भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रातून निधी आणून ही योजना पूर्ण करणार व सांगोला तालुका दुष्काळ मुक्त करू असे सांगितले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: