रणधुमाळीराज्यUncategorized

आळंदी नगरपरिषदेच्या यात्रा समिती सभापती पदी सागर बोरुंदिया

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, ( आळंदी ) – नगरपरिषदेतील विशेष समितीच्या नियुक्त्या खेळीमेेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या. या विशेष समिती नियुक्त करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून खेड तालुक्याचे तहसिलदार सुचित्रा आमले यांनी काम पाहिले. या विशेष समितीच्या नियुक्त्यासाठी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सचिनशेठ गिलबिले, भाजपचे गटनेते पांडूरंग वहीले, विरोधी पक्षनेते तुषार घुंडरे तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते .

यावेळी भाजप गटनेते पांडुरंग वहीले यांनी विशेष समितीच्या नियुक्त्यांसाठी भाजपकडून सदस्यांची यादी मुख्याधिकारी समीर भुमकर यांना सुपूर्द करण्यात आली. शिवसेनेकडून कोणत्याही सदस्याचे नाव देण्यात आले नाही, प्राप्त यादी नुसार स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांची तर सदस्य पदी सचिन गिलबिले, प्रशांत कुर्‍हाडे, सागर बोरुंदिया, प्रमिला राहणे, सुनिता रंधवे, रुक्मिणी कांबळे यांची नियुक्ती झाली. पाणी पुरवठा पदसिद्ध सभापतीपदी उपनगराध्यक्ष सचिनशेठ गिलबिले यांची तर सदस्य म्हणून पांडुरंग वहीले, प्रशांत कुर्‍हाडे यांची नियुक्ती झाली. यात्रा नियोजन आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी सागर बोरुंदिया यांची तर सदस्य म्हणून पांडुरंग वहील, श्रीमती पारूबाई तापकीर यांची नियुक्ती झाली, बांधकाम समिती सभापती पदी प्रमिला राहणे यांची तर सदस्य म्हणून सागर भोसले, मिराताई पाचुंदे यांची नियुक्ती झाली, शालेय शिक्षण क्रिडा आणि सांस्कृतिक समिती सभापती पदी प्रशांत कुर्‍हाडे यांची तर सदस्य म्हणून सागर बोरुंदिया, सचिन गिलबिले यांची नियुक्ती झाली, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदी श्रीमती रुक्मिणी कांबळे यांची तर सदस्य पदी श्रीमती पारूबाई तापकीर, मिराताई पाचुंदे यांची नियुक्ती झाली, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती पदी श्रीमती सुनीता रंधवे यांची तर सदस्य म्हणून श्रीमती रुक्मिणी कांबळे, सागर भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व समिती सभापतींचा पीठासीन अधिकारी सुचित्रा आमले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी यात्रा समिती च्या सभापती पदी सागर बोरुंदिया यांची नियुक्ती झाल्या मुळे त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवत आपला आनंद साजरा केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: