इतररणधुमाळीराज्यसोलापूरUncategorized

माढयात शिंदे बंधूंची भाजपला “रसद”?

Spread the love

समाधान वाघमारे, (विशेष प्रतिनिधी)- जलसंधारण मंत्री राम शिंदे व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा दि ६ मार्च रोजी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माढा मतदार संघात गावभेट दौरा संपन्न झाला होता. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक पदाधिकारी पंचायत समीती सदस्य रांझणी धनाजी जवळगे, विठ्ठलराव शिंदे स.सा.कारखान्याचे संचालक रामभाऊ टकले, सरपंच चांदज बळीराम हेगडकर, सोमनाथ जवळगे चेअरमन वि.से.सो.आढेगाव यांसह अनेक आमदार समर्थक उपस्थीत होते.

त्यामुळे माढा मतदारसंघात चर्चेला उधाण येऊन शिंदे यांची रसद सुभाष देशमुखांना तर नाही ना ? असे तर्कवितर्क बांधले जाऊ लागले आहेत. तर करमाळयात झालेल्या पवारांच्या कार्यक्रमास शिंदे गटाने पाट फिरवली होती. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी विरोधकांची झालेल्या बैठकीनंतर माढा मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

संजय शिंदे हे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक असून शरद पवारांच्या सोबत झालेल्या बैठकीत शिंदेंना आमदारकी बाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. यातच आता शिंदे गटाचे समर्थक भाजपच्या मंत्र्यांसोबत माढयात गावभेट दौऱ्यात दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे आपल्या बंधूंच्या आमदारकीसाठी प्रयत्न करत असताना माढा लोकसभेला पवारांच्या विरोधात भाजपला छुपी रसद तर देत नाहीत ना ? अशी चर्चा मतदारसंघातील जनतेतून होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: