अहमदनगरउत्तर महाराष्ट्रराज्य

नगर-औरंगाबाद महामार्गावर पोलिस व्हॅन आणि कंटेनरचा अपघात

Spread the love

रविंद्र सरोदे, (अहमदनगर) – नगर-औरंगाबाद महामार्गावर माळी चिंचोरा फाट्याजवळ ता. नेवासे येथे पोलिस व्हॅन आणि कंटेनरचा अपघात झाला.केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचा-यांना बंदोबस्तासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. हे कर्मचारी जळगावकडे परतत असताना सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास  पोलीस व्हॅन  आणि कंटेनर अपघातात अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले. असून ,पोलीस व्हॅन  या वाहनाचे मोठे नुकसान झाले. जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे सतरा पोलीस कर्मचारी दि.७ एप्रिल रोजी नगर येथे बंदोबस्त कमी आले होते. मंगळवारी सकाळी नगर येथील बंदोबस्त करून जळगाव कडे निघाले होते. यामध्ये अमोल भोसले, मनोज पाटील, सागर पाटील, विजय बच्चाव, अशोक मोरे, महेंद्र उमाळे, किरण मोरे, मनोज तडवी, शामराव उखलभील, प्रदीपकुमार चव्हाण, चालक हेमंत पाटील हे जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय नेवासे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान नेवासे पोलीसांनी घटनास्थळी तातडीने जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी ग्रामीण रुग्णलयात जाऊन जखमी कर्मचा-यांची विचारपूस केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: