पश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कोयना परिसराच्या विकासासाठी शासनाकडून ठोस कृती कार्यक्रम

Spread the love

विजय लाड,  (कोयनानगर) – जगाला हेवा वाटेल असे ठिकाण असणाऱ्या कोयना परिसरातील निसर्गरम्य ठिकाणाचा विकासासाठी शासनाकडून ठोस कृती कार्यक्रम सुरू होत आहे. त्यामुळे जागतिक पर्यटनाच्या क्रमवारीत कोयना हे नाव नंबर वन येण्यासाठी सज्ज झाले आहे. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आसून यामुळे कोयना पर्यटनाला अच्छे दिन येवून या स्थळास प्रादेशिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणार आहे.
सृष्टीला पडलेले निसर्गरम्य व मनमोहक स्वप्न भूतलावरील नंदनवन असणारा निसर्गरम्य परिसर म्हणजे कोयना परिसर आहे. कोयना धरण व जगप्रसिद्ध कोयना प्रकल्पामुळे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पर्यटनपूरक वातावरण या परिसरात आसल्यामुळे अल्पावधीतच पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आला आहे. कोयना धरण, जलविद्युत प्रकल्प, नेहरू उद्यान, ओझर्डे धबधबा हे कोयना पर्यटनाच्या शिरपेचातील महत्वाचे तूरे आहेत. या ठिकाणा बरोबर परिसरातील अन्य ठिकाणे विकसित करणे गरजेचे होते.

पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई ही गरज ओळखून कोयना पर्यटन विकसित करण्याकरीता शासनाने पर्यटन विकास आराखडा तयार करून त्याला तात्काळ चालना देण्याची मागणी केली होती. 2017-18 हे आर्थिक वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतल्याने कोयना धरण व तेथील नयनरम्य परिसराला प्रादेशिक पर्यटन स्थळाचा दर्जा देवून कोयना परिसराचा सविस्तर विकास आराखडा तयार करून त्यास पर्यटन विकास महामंडळाने निधी उपलब्ध करून द्यावा. या प्रमुख मागणी बरोबर कोयना धरण व आसपासचा 10 किमीचा परिसर हा विकसित करून पर्यटनाला चालना देण्याची मागणी केली होती. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होवून व्यवसायव्रुद्धी करण्यावर भर दिला आहे.
या पर्यटन आराखडयामध्ये कोयनानगर मध्ये बालगोपाळासाठी वॉटरपार्क उभारणी, नवजा येथील जंगली जयगड किल्लावरून कोकण दर्शन व्हावे यासाठी त्याचा विकास करणे, प्रचितीगड भैरवगड विकसित करून पर्यटकांचा ओघ वाढवणे, शिवसागरात बोटीगं स्पॉट विकसित करणे, कोयना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीटलाइट बसविणे, कोयना धरण येथील प्रसिध्द चेमरी हे विश्रामगृह प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, कोयना धरणासमोरील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारणी, धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील करंज्याचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे, कोयनानगर मधील नेहरू उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई म्हणाले, कोयना पर्यटन विकासाचा आराखडया बाबत झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात तालीका सभापती असताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी विचारले असताना त्यांनी कोयना पर्यटनाचा आराखडा तत्काळ तयार करावा आणि तो शासनाला सादर करावा. अशा सूचना सातारा जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. शासनाने आपली मागणी मान्य करून प्रत्यक्ष कृती सुरू केली आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: