इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

वडिलांचा वारसा चालवत नावाप्रमाणे"शौर्य उपक्रम"

Spread the love

नम्रता कामत,(पुणे) – दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण शौर्य कुणाल नायडू चा चौथा वाढदिवस चार देशी झाड (३ उंबर,       १ मोहगनी) सुस खिंड टेकडी वर लाऊन साजरा केला. हा चिमुकला शौर्य ए.डब्लू. सिंधू विद्या भवन शाळेत नर्सरीला शिक्षण घेत आहे.

परिक्षा सुरू असल्याने सकाळी  सामान्य ज्ञानाचा चा पेपर देऊन आल्यावर वृक्षारोपण करण्यात आले. शौर्यला एवढ्या लहान वयातच खुप आवड आहे ती झाड व बिया जमवण्याची. त्याला सामान्य देशी झाडाची नाव देखील माहीत आहेत व झाडाची ओळख पण आहे.

चिमुकला शौर्य हा शाळेतील त्याच्या मित्रांना पण वृक्षारोपण करायला सांगणार आहे. खरच; स्वतःचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि बाकी इत्यादी विशेष दिवशी अशा प्रकारे झाड लावून साजरा केल्यास प्रदुषणावर आपण सहज मात करू शकतो. हा जणु संदेशच आपल्याला या चिमुकल्यानं दिला आहे; अन् तो आपण अमलात आणायला पहिजे. मग अता लगा तयारी ला.

Tags

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Close
%d bloggers like this: