कोल्हापूरपश्चिम महाराष्ट्रयुथ कट्टाराज्यशिक्षण

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सुमो गाडीचा अपघात

Spread the love

राहूल गडकर, (कोल्हापूर) – दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपर संपल्यानंतर घरी घेऊन जाणाऱ्या सुमो गाडीचा अपघात झाला. या अपघातात ड्रायव्हरसह ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना चंदगड तालुक्यातील डुकुरवाडी-माणगांव जवळ घडली आहे.

sumo in accident
अपघातग्रस्त झालेली सुमो गाडी

गाडीचा अपघात झाल्यानंतर सुमो १५ ते २० फूट रस्त्यालगत खाली पलटी झाली. सकाळी १० वाजताचा पेपर संपल्यानंतर गाडीत दंगा करत विद्यार्थी प्रवास करत होते. यावेळी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास चालू आहे.

Tags

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Close
%d bloggers like this: