इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्य

अपना वतन संघटनेच्यावतीने "मिशन भाईचारा" अंतर्गत गोशाळेला आर्थिक मदत 

Spread the love

दत्ताञय फडतरे, (पुणे) – अपना वतन संघटनेच्या वतीने भारत देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी जात-पात धर्म यांच्यापलीकडे जाऊन देशासमोर उभ्या असलेल्या आतंकवाद, धर्मवाद, भाषावाद, कुपोषण, भूकबळी, बेरोजगारी, निरक्षरता, स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार, व्यसनाधीनता, आर्थिक व सामाजिक विषमता, भ्रष्टाचार, दलित अल्पसंख्यांकावरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, भूमाफिया यांसारख्या अनेक समस्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून या प्रमुख समस्यांविरोधात लढण्यासाठी ” मिशन भाईचारा ” हे अभियान सुरु करण्यात आले आहे. त्याअंतर्गत अपना वतनच्या वतीने महाराष्ट्र दौरा सुरु करण्यात आला आहे. त्या माध्यमातून मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बुद्धविहार अशा धार्मिक ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांना भारत देशातील मूलभूत समस्यांवर एकत्रित येऊन मानवतेसाठी लढण्यास प्रवृत्त करीत आहोत.
संघटनेच्या वतीने मावळ तालुक्यातील अर्डव येथील’ महावीर गोपाळ कृष्ण ट्रस्ट ” या गोशाळेला भेट देण्यात आली. त्यावेळेस तेथील गोशाळेची पाहणी केली. गाईंसाठी पाणी व चाऱ्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी १५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली. त्यावेळेस अखिल भारतीय वारकरी संघाचे  मावळ तालुका संघटक व गोशाळेचे अध्यक्ष ह. भ. प. सुनील महाराज वारघडे, ह. भ. प. लक्ष्मण महाराज ठाकर यांना संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी मिशन भाईचारा या अभियानाची सविस्तर माहिती दिली. या अभियानास सहकार्य करण्याची विनंती केली.
ह. भ. प. सुनील महाराज वारघडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपना वतनच्या या अभियानास अखिल भारतीय वारकरी संघाच्या वतीने सक्रिय सहभागी होऊन मदत केली जाईल असा शब्द दिला. २ वर्षांपूर्वी सिद्दिकभाई शेख यांनी दत्तक घेतलेल्या  ” सह्याद्री ” या वासराने त्याना पाहताच हंबरडा फोडत त्यांचा जवळ येऊन उभा राहिला या दृश्याने  गोशाळेमध्ये अतिशय भावनिक व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. जनावरांना सुद्धा प्रेम दिले तर त्यांच्यामध्ये एक नाते निर्माण होते याचा प्रत्यय यावेळेस आला. यावेळेस अपना वतन संघटनेचे संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर, तौफिक पठाण, अस्लम शेख, हाजीमलंग शेख, अब्दुल शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: