आरोग्यइतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यलैंगिक शिक्षणविदर्भशिक्षणसामाजिक

लैंगिकतेवर बोलू काही…भाग २७ – शंका व निरसन – ४

Spread the love

नवविवाहीत जोडप्यांना कामजीवनाची माहिती मिळण्यासाठी कामुक चित्रपट पुस्तक भेट देणे योग्य आहे का?
बिलकुल नाही. यातून स्त्रीच्या योनीतील स्राव, कामवासना तिचा मोकळेपणा तसेच पुरुषांचा रात्रीतून केला जाणारा संभोग, जास्त वेळा चालणारा संभोग  याविषयी अतिशयोक्ती वर्णन केलेले असते. यातून संभोगाचे काय सत्य-असत्य हे जोडप्यांना समजत नाही. हे वाचून निराशा झाली की, प्रचंड मानसिक दबाव दोघांवरही येतो  व पहिल्याच दिवशी गैरसमज होऊ शकतात. खटके उडतात, हळव्या मनाच्या लोकांकडून पण कामजीवनाविषयी शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला विवाहापूर्वीच घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे चित्रपट पुस्तक न व जोडप्यांना देऊ नये.

एका रात्रीत आणि आठवड्यात किती वेळा संभोग करावा ?

याला ठोस नियम नाही.  प्रत्येक पती-पत्नीच्या आवडीनिवडीवर प्रमाण व पद्धत ठरते. कौटुंबिक वातावरण मुलांची वये, काम जीवनावरील अभ्यास, लग्नानंतरच्या कालावधीत घरातील खाजगीपणा शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, दोघांचा निसंकोचपणे यावर संभोगाचे प्रमाण ठरते. संभोग कितीही वेळा ठेवा. फक्त दोघांना कामापुरती मिळावी ही अपेक्षा.  बऱ्याच वेळा पुरुष स्वतःची लैंगिक भूक शमवितो पण स्त्रीला कामापुरतीच मिळत नाही हे कटू सत्य आहे. कारण पुरुष हावरटासारखा पत्नीबरोबर संभोग करतो. निव्वळ जास्त वेळा संभोग ठेवला, तर पत्नीचे समाधान होते व तिची इच्छा प्रत्येक वेळा असतेच असे नाही. स्वतःची भूक बघून दुसऱ्यांवर संभोग लादने म्हणजे विवाह अंतर्गत बलात्कारच होय. असे बलात्कार दररोज भरपूर होतात. थोडक्यात दोघांच्या इच्छेने कितीही वेळा संभोग करावा.
माझ्यावर पुरुष नसबंदी झाली होती आता आम्हाला पुन्हा बाळ हवं म्हणून पुन्हा नस जुळवली तरी पत्नी गरोदर होत नाही असे कसे ?
शुक्र प्रवाह मालिका पुन्हा जुळवून देखील गरोदर रहात नसेल तर तुमची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली का ?याची खात्री करून घ्यावी. वीर्य तपासणी करून पहावी, त्यात शुक्रजंतू दिसू लागले तर शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली असे म्हणावे.  अन्यथा शुक्र वाहक नदी का व्यवस्थित जुळली केली नाही किंवा तुमच्या परशन ग्रंथीमध्ये काही आजार निर्माण होऊन शुक्रजंतू निकामी झाले असावेत. सर्व नॉर्मल असेल व शस्त्रक्रिया बरोबर झाली असेल, तर पत्नीमध्ये काही दोष निर्माण झाला आहे का ते पहावे. नसबंदीचे ऑपरेशन करून पुन्हा नलिका जुळवली तर बाळ होण्याची शक्यता असते. फक्त ते डॉक्टर त्या शस्त्रक्रियेत किती तज्ञ आहेत यावर त्याची यशस्विता ठरते यासाठी डॉक्टरांशी चर्चा करा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-९८२२५३४७५४)
अापले काही प्रश्न, समस्या, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरुर विचारा… तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी सब्स्क्राईब करा.
मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
भाग – १ लैंगिक शिक्षण काळाची गरज…!
https://goo.gl/j8UBTy
भाग – २ लैंगिक शिक्षणाचा अभाव व तोटे
https://goo.gl/1K6XB2
भाग – ३ हस्तमैथुन एक वरदान…
https://goo.gl/SQnvty
भाग – ४ विवाहपूर्व समुपदेशन
https://goo.gl/HE1AXA
भाग – ५ स्त्री – पुरुष तपासण्या
https://goo.gl/3AGdT2
भाग ६ – कामजीवन आणि स्त्रिया
https://goo.gl/nZrwJD
भाग ७ – कामजीवन आणि पुरूषांच्या समस्या
https://goo.gl/hQ6FM2
भाग ८ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
https://goo.gl/1CBngs
भाग ९ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
पुरुषांच्या समस्या भाग ३ – अतिकामवासना
https://goo.gl/q5RmK4
भाग १० – पुरुषांच्या समस्या- कमी कामवासना
https://goo.gl/MdYxMw
भाग ११ – कामजीवन का अाणि कसे ?
कामजीवनातील सत्य भाग १
https://goo.gl/i6KBtx
भाग १२ – कामजीवन का अाणि कसे ? भाग २
https://goo.gl/ZDGDpm
भाग १३ – कामजीवन का अाणि कसे ? भाग -३
https://goo.gl/XsD1dL
भाग १४ – कामजीवन का अाणि कसे ? भाग – ४
लैंगिक शिक्षण देताना घ्यावयाची काळजी
https://goo.gl/Aw9GeF
भाग १५ – नवविवाहितांसाठी चांगले गर्भनिरोधक साधन कोणते ?
https://goo.gl/QuKZJk
भाग १६ – विवाहबाह्य संबंध थांबवता येतील का ?
https://goo.gl/h7vGiL
भाग १७ – पुरुषांचे काम (अ) विचार
https://goo.gl/ubXxp2
भाग १८ – पालक बालक नातेसंबंध व कामजीवनावर परिणाम
https://goo.gl/prHvg2
भाग १९- कामविश्व – वार्ता
https://goo.gl/P5X9Ff
भाग २० – कामजीवनाविषयी काही रोचक तथ्ये
https://goo.gl/mRbeyY
भाग २१ – भारतीयांच्या लैंगिक समस्यांमागील कारणे
https://goo.gl/R251gM
भाग २२- कृत्रिम गर्भधारणेचे प्रकार
https://goo.gl/SPhJ5Z
भाग २३ – खोटया जाहिरातींचा प्रभाव आणि पेशेंट
https://goo.gl/b84v38
भाग २४ –  शंका व निरसन – १
https://goo.gl/A9pYfY
भाग २५ –  शंका व निरसन – २
https://goo.gl/bPYVFg
भाग २६–  शंका व निरसन – ३
https://goo.gl/mPUkfu

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: