देश विदेश

भारतावर हल्ल्यासाठी चीनचे क्षेपणास्त्र तळ!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत आणि चीनदरम्यान तणाव कायम आहे. चीनकडून डोकलाम आणि नाकुला येथे क्षेपणास्त्र तळांची उभारणी केली जात असल्याचे उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांवरून समोर आले आहे.

‘ओपन सोर्स इंटेलिजन्स अ‍ॅनालिस्ट’ने आपल्या ट्विटर हँडलवर हे सॅटेलाईट फोटो शेअर केले आहेत. चीन, भूतान आणि भारताच्या सीमा एकत्रित येतात, अशा डोकलाम भागात चीन हा तळ उभारत आहे. हे ठिकाण गलवान खोर्‍यापासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे.

भारतीय हवाई दलानेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूने सर्व प्रमुख केंद्रांवर सैनिक, हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट तैनात केले आहेत. हवाई दलाने सी-17 ग्लोबमास्टर 3 ट्रान्स्पोर्ट एअरक्राफ्ट, सी-130 जे सुपर हर्क्यलस तैनात ठेवले आहेत.

सीमेवरील तिबेटींचे स्थलांतर

चीनने अरुणाचल आणि भूतान सीमेवरील तिबेटी नागरिकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनला नेमके काय साध्य करायचे आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने भारत आणि भूतान सीमेजवळील 96 गावांतील लोकांचे चीनकडून अन्यत्र पुनर्वसन सुरू असल्याचे वृत्त दिले आहे. ही गावे खाली करून सीमेलगतच्या भागात चीनकडून जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. अरुणाचल प्रदेशमधील तवांग हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे चीन सांगतो. तवांग हे बौद्ध धर्मातील पवित्र स्थळांपैकी एक आहे. 1962 च्या युद्धात चिनी सैन्य तवांगपर्यंत पोहोचले होते.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close