आरोग्यइतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईयुथ कट्टाराज्यलैंगिक शिक्षणविदर्भसामाजिक

लैंगिकतेवर बोलू काही…भाग २३ – खोटया जाहिरातींचा प्रभाव आणि पेशेंट

Spread the love

अरविंद ३५ वर्षीय विवाहीत पुरुष. माझ्या मार्गदर्शन केंद्रात आले. त्यांची तक्रार होती की, हस्तमैथुन केल्याने लिंगाचा आकार लहानच झाला आहे. त्यावर औषधोेपचार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले होेते. हस्तमैथुन व इतर प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडून अशी माहिती समजली की, साधारण ३० वर्षाचे असतांना लग्न झाले. विवाहापूर्वी हस्तमैथुन नियमित करत, हस्तमैथुनाविषयी प्रचंड गैरसमज होते. दुसऱ्याचे लिंग पाहता येत नाही त्यामुळे स्वतःच्या लिंगाच्या आकारावरुन मनावर दडपण घेत असत व त्यामुळे विवाहाला वेळ लागला. आता त्यांना दोन मुले आहेत. कोणतेही व्यसन नाही. विवाहपूर्वी संभोगसुख घेतले नाही.
माझ्याकडे येण्याआधी कोल्हापूर शहरातील हॉटेलमध्ये थांबणाऱ्या भोंदू डॉक्टरकडून उपचार ? घेऊन आले होते. फरक नाही. अरविंदच्या तक्रारीवर उपचार करतांना सिस्टीमॅटीक डिसेन्सिटायझेशन करावे लागते. म्हणजे ज्या गैरसमजापोटी मानसिक त्रास झालेला आहे, भीती घेतलेली आहे ती हळूहळू कमी होते. त्यामुळे मी त्यांना पुढील प्रश्न विचारत होतो. जास्त बोलल्याने जीभ कमी होते का ? तसेच जास्त एेकणे, जास्त पाहणे, जास्त श्वास घेणे यामुळे कान, डोळे, नाक यांचे आकार कमी होतात का ? अर्थातच याचे उत्तर अरविंदकडून नाही असेच आले. मी म्हणालो, याचाच अर्थ हस्तमैथुन केल्याने लिंग कसे बारीक होईल ? यावर अरविंदच्या चेहऱ्यावर थोडे हास्य आले.
अरविंदच्या जननेंद्रियांची तपासणी केली. सर्व रचना नॉर्मल होती. कोणताही दोष वाटत नव्हता. सेंकडरी सेक्सस्युल कॅरेक्टर चांगले होते. दाढी, मीशा, काखेत, जांघेत केसांची ठेवण चांगलीच होती. मला खात्री पटली की, लैंगिक अवयवात तरी दोष नाही. अरविंदला लिंग ताठरतेची तक्रार नव्हतीच. पुन्हा माझ्या संगणकावरील विविध आकाराचे लिंगाचे चित्रे दाखवली. ते पाहिल्यानंतर अरविंदच्या मनातील भीती कमी झाली. बरेचसे डॉक्टर मल्टीमीडियाचा वापर करत नाहीत. माझ्या मार्गदर्शन केंद्रात मी गेली अडीच वर्षे याचा वापर करीत आहे. त्यामुळे पेशंटना त्याचे फायदे जाणवत आहेत. अरविंदनाच काय बऱ्याच पुरूषांना असे वाटते की, शिथिल अवस्थेतील लिंग मोठे हवे. वास्तवात तसे नाही. शिथिल अवस्थेत सर्वांचेच लिंग लहान असू शकते, ते कोणत्याही बाजूला कलू शकते.
उद्दिपित झाल्यावर पोटापासून लिंगाच्या टोकापर्यंत अशी लांबी मोजतात ती थोडीशी चुकीची आहे. योग्य पद्धत चित्राचा वापर करुन पेशंटला सांगावी लागते. तसेच त्याची खरी लांबी से.मी.मध्ये साधारण १४ ते १६ से.मी. असते. तरी काही रोगींमध्ये त्याची उद्दीपित अवस्थेतील लांबी ५ से.मी. पेक्षा कमी असते. आतापर्यंत जवळजवळ हजार पुरूष पेशंटचे लिंग मी तपासले. त्यात फक्त ४ पेशंटचे लिंग लहान होते. त्यांच्यात काही गंभीर आजार होते. बाकी सर्व नॉर्मलच होते.  हे सर्वंच जण माझ्याकडे येतांना लिंगाच्या आकारबाबत भीती घेऊनच आलेले होते.
अरविंदनी हे सर्व एेकल्यावर व संगणकावरील माहिती पाहिल्यानंतर पुन्हा विचारले, डॉक्टर तुम्ही म्हणता मला रोग नाही, मी नॉर्मल आहे, तर हॉटेलमधील डॉक्टरांनी असे कसे सांगितले ? मी विचारले भोंदू डॉक्टरांवरील माझा डार्लिंग मधील तुम्ही लेख वाचला नाही का ? तेव्हा अरविंद म्हणाले, मी दुसऱ्या दैनिकातील डॉक्टरची जाहिरात वाचून तिकडे गेलो. माझा मित्र नियमित तरुण भारत वाचतो. त्याने तुमचे नाव सांगितले व मी आलो.
भोंदू डॉक्टरांना हे माहित असते की, सर्वच पुरूष हस्तमैथुन करतात. पेशंट त्यांच्याकडे गेला की, अरे बापरे, तुम्ही लहानपणापासून हस्तमैथूनाची सवय लावलीय म्हणून लिंग बारीक झाले आहे. असे सांगून त्याची फसवणूक केली जाते. त्याची आर्थिक लूट केली जाते. या जाहिरातीचा किती वाईट परिणाम भेळ्या भाबड्या वाचकांवर पडतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
या केसमधून आपण काय शिकायचे आहे की, शरीर जसे आहे तसे मान्य करावे. अनुवांशिक गुणांमुळे आपल्या शरीराची ठेवण विशिष्टरित्या झाली असते. त्यात बदल करण्याची गरज नसते किंवा करु नये. लिंगाचा आकार कितीही असो पती-पत्नीला संभोग सुखाचे शास्त्रीय ज्ञान असणे गरजेचे आहे. आकार मोठा आहे व शास्त्रीय ज्ञानच नाही तर त्या आकाराला काही महत्तच नाही.
लैंगिक शिक्षण, आधुनिक कामशास्त्र यांचा शास्त्रीय अभ्यास केला तर नक्कीच भोंदू डॉक्टरांवर बराच परिणाम होणार आहे. कोणतीही लैंगिक समस्या असल्यास व विवाहपूर्व मार्गदर्शनासाठी फक्त अधिकृत लैंगिक समस्या तज्ञास भेटावे.
–  डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
अापले काही प्रश्न, समस्या, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरुर विचारा… तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी सब्स्क्राईब करा.

मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 
भाग – १ लैंगिक शिक्षण काळाची गरज…!
https://goo.gl/j8UBTy
भाग – २ लैंगिक शिक्षणाचा अभाव व तोटे
https://goo.gl/1K6XB2
भाग – ३ हस्तमैथुन एक वरदान…
https://goo.gl/SQnvty
भाग – ४ विवाहपूर्व समुपदेशन
https://goo.gl/HE1AXA
भाग – ५ स्त्री – पुरुष तपासण्या
https://goo.gl/3AGdT2
भाग ६ – कामजीवन आणि स्त्रिया
https://goo.gl/nZrwJD
भाग ७ – कामजीवन आणि पुरूषांच्या समस्या
https://goo.gl/hQ6FM2
भाग ८ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
https://goo.gl/1CBngs
भाग ९ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
पुरुषांच्या समस्या भाग ३ – अतिकामवासना
https://goo.gl/q5RmK4
भाग १० – पुरुषांच्या समस्या-  कमी कामवासना
https://goo.gl/MdYxMw
भाग ११ – कामजीवन का अाणि कसे ?
कामजीवनातील सत्य भाग १
https://goo.gl/i6KBtx
भाग १२ – कामजीवन का अाणि कसे ? भाग २
https://goo.gl/ZDGDpm
भाग १३ – कामजीवन का अाणि कसे ? भाग -३
https://goo.gl/XsD1dL
भाग १४ – कामजीवन का अाणि कसे ? भाग – ४
लैंगिक शिक्षण देताना घ्यावयाची काळजी
https://goo.gl/Aw9GeF
भाग १५ – नवविवाहितांसाठी चांगले गर्भनिरोधक साधन कोणते ?
https://goo.gl/QuKZJk
भाग १६ – विवाहबाह्य संबंध थांबवता येतील का ?
https://goo.gl/h7vGiL
भाग १७ – पुरुषांचे काम (अ) विचार
https://goo.gl/ubXxp2
भाग १८ – पालक बालक नातेसंबंध व कामजीवनावर परिणाम
https://goo.gl/prHvg2
भाग १९- कामविश्व – वार्ता
https://goo.gl/P5X9Ff
भाग २० – कामजीवनाविषयी काही रोचक तथ्ये
https://goo.gl/mRbeyY
भाग २१ – भारतीयांच्या लैंगिक समस्यांमागील कारणे
https://goo.gl/R251gM
भाग २२- कृत्रिम गर्भधारणेचे प्रकार
https://goo.gl/SPhJ5Z

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: